जाणून घ्या, ह्या वनस्पतीचे आरोग्यदायी फायदे | पाहा हा वीडियो | Lokmat News

2021-09-13 0

त्वचा आणि केसाच्या समस्येवर कोरफडीचा रस लावल्यास त्याचे अनेक फायदे आहेत.
कोरफडी च्या रसामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळेच दररोजच्या आहारात एनर्जी ड्रिंक म्हणून रसाचा समावेश केल्यास शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणूनही कोरफडीचा वापर केला जातो.कोरफडीचा रस पचनक्षमता वाढवते तसेच पित्ताचा त्रास कमी होण्या सही मदत होते .कोरफडीच्या रसामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुरळीत होते.कोरफडी रसाचे सेवन केल्यास संधिवाताच्या वेदना कमी होण्यास मदत होते.
कोरफडीचा रस मधुमेहावरही अत्यंत गुणकारी आहे. कोरफडी रसाचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires